Ladki Bahin Diwali Bonus : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. सरकारच्या माहितीनुसार, जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
महिलांना पहिल्या ते चौथ्या हफ्त्याचे पैसे मिळाले आहेत, असेही सांगण्यात आले आहे. आता महिलांना पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी निमित्त, सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपयेही दिले जाणार आहेत. पण हा बोनस नेमका कोणत्या महिलांना मिळणार, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचं पालन करावं लागतं. महिलांचं वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावं, त्या महाराष्ट्रातील रहिवासी असाव्यात, आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. या सणासाठी योजनेच्या पात्र महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे, जो नियमित मिळणाऱ्या रकमेच्या अतिरिक्त असेल.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच काही महिलांना यासोबतच 2500 रुपयांची जादा रक्कमही मिळेल, ज्यामुळे त्यांना एकूण 5500रुपये मिळणार आहेत. हा दिवाळी बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच दिला जाईल. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.