PM Kisan Nidhi Yojana List : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात.केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपये देण्यात आलेले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकऱ्यांना मात्र आता पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी तीन कामं करावी लागणार आहेत.
पीएम किसान 18 व्या हप्त्याची रक्कम 2000 रुपये, तारीख ठरली
ई-केवायसी, आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या या तीन बाबी प्रलंबित असतील त्यांना त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपये प्रमाणं 6 हजार रुपये पाठवले जातात.